…अन् लग्नानंतर उलगडलं 25 वर्षीय महिला पुरूष असल्याचं रहस्य; वाचा संपूर्ण प्रकार
बीजिंग | पिंगपिंग नावाची एक 25 वर्षाची महिला गेल्या वर्षभरापासून गर्भवती राहण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तीला त्यात यश मिळालं नाही. एवढंच नाही तर या महिलेला कधीच मासिक पाळी देखील आली नसल्याचं तीने सांगितलं आहे. यादरम्यान तीच्या पायाला झालेली दुखापत दाखवण्यासाठी एका डाॅक्टरकडे गेली होती. त्यानंतर तीच्या पाया खालची जमीन सरकेल अशी धक्कादायक बाब समोर आली. ती महिला पुरुष असल्याचं तीला डाॅक्टरांकडून समजलं.
ही घटना चीन भागातील आहे. ही महिली एका दुर्मीळ आजाराने पिडीत असल्याचं समोर आलं आहे. या महिलेला एक्स 46 विकार असून या आजारामध्ये पुरुषांचे गुणसुत्र असतात. महिलेने दिलेल्या महितीनुसार तीला फिमेल ऑर्गन असल्यामुळे तीने कधीचं मासिक पाळी न येण्याकडे लक्ष नाही दिलं. मात्र पाळी न येण्यामुळे तीला खूप त्रास होतो आणि लोक काय म्हणतील? या विचाराने तीने हे कधीचं कोणाला सांगितलं नाही, असं देखील तीनं म्हटलं आहे.
महिलेच्या पायाला झालेली जखम दाखवायला डाॅक्टरांकडे गेल्यानंतर डाॅक्टरांनी व्यवस्थित तपासणी केल्यानंतर पिंगपिंग पुरुष असल्याचं कळालं. डाॅक्टरांनी सांगितल्यानुसार पिंगपिंगला अंडाशय किंवा गर्भाशय नसल्यामुळे ती गर्भवती होऊ शकत नाही.
दरम्यान, अमेरिकाच्या आनुवंशिक आणि दुर्मिळ रोग केंद्राच्या मते अशा अवस्थेत काही अवयव स्पष्टपणे दिसत नाही. मात्र सर्जरी किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी करुन यावर उपचार करण्यात येऊ शकतो.
थोडक्यात बातम्या-
कंगणा राणावतची आता थेट महात्मा गांधींवर टीका, म्हणाली…
रोड रोमियोला विद्यार्थिनीने भररस्त्यात धू-धू धुतलं, पाहा व्हिडिओ
भर मैदानात वाॅशिंग्टन सुंदर आणि जाॅनी बेअरस्टो भिडले, अन्…
“आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा, तेल स्वस्त झालंय का?”
“लॉकडाऊनपेक्षा मृत्यूदर कसा कमी करता येईल याचं नियोजन करा”
Comments are closed.