‘मुख्यमंत्री तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई | मुंबईमधील एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या महिलेला तिकीट तपासणाऱ्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी पकडलं. मात्र या महिलेने आपल्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नाहीत असं सांगितलं. यानंतर या महिलेने फेसबुक लाईव्ह करत घडलेला प्रकार सांगितला. या व्हिडीओमध्ये या महिलेने ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
माझ्याकडे पैसे नाहीत माझ्यावर कारवाई करा. मला किती वेळ बसवायचंय बसवा. आता तर मी मास्क पण नाही लावणार. त्याचा पण दंड मी भरणार नाही, असं ही महिला व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
तुम्हाला माहितीये बाहेर काय अवस्था आहे. तुम्हाला पगार मिळाला या काळामध्ये. लोकं बाहेर बिनपैशाचे मेले. आहो करोना असाच राहणार आहे. दंडाच्या नावाखाली हे सरकार गरिबांकडून पैसे लुटतंय, असा गंभीर आरोप या महिलेने केला आहे.
कोणत्या तुरुंगात न्यायचं आहे तिकडे. मी तिकीटाशिवाय प्रवास करत नाहीय. कोणत्या नियमाखाली कारवाई करता बघू दे, असं म्हणत ही महिला टीसी ऑफिसमध्ये जाऊन बसली. तसेच बघू द्या माझ्यावर किती केसेस दाखल होतात, असं त्यांनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
संभाजीराजेंना बोलू न दिल्यानं संजय राऊत भडकले, पाहा व्हिडीओ
“मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही ते सांगा”
हिमाचल प्रदेशातील नॅशनल हायवेवर दरड कोसळली; धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल
‘…तर निवृत्तीनंतर दोन कोटी मिळतील’; जाणून घ्या ‘या’ योजनेबद्दल
अनाथ मुलांसाठी राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
Comments are closed.