‘ओयो रुममध्ये हनुमानाची आरती…’; महिला आयोगाने मुलींना सुनावलं

नवी दिल्ली | हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया (Renu Bhatia) यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होणाऱ्या अत्याचारांवरील आरोपांविषयी बोलताना रेणू भाटिया (Renu Bhatia) यांनी मुलांनी सुनावलं आहे.

रेणू भाटिय हरियाणाच्या एका कॉलेजमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या शारीरिक शोषणाच्या घटनांवर त्यांनी मुलींना सुनावलं.

ओयो रुममध्ये मुली हनुमानाची आरती करायला तर जात नाहीत. अशा ठिकाणी जाताना तुमच्यासोबत वाईट प्रसंग घडू शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे, असं भाटिया म्हणाल्या. 

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बनवलेल्या लिव्ह-इन रिलेशनशिप कायद्यामुळे महिलांशी संबंधित प्रकरणे सोडवताना आयोगाचे हात बांधले गेले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप कायद्यात बदल करण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More