बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निवृत्त प्राध्यापकानं केलं असं काम, दोन वर्षात गाव झालं दुष्काळमुक्त!

नाशिक | नाशिकमधील सिन्नर तालुक्याजवळील देशवंडी हे गाव एकेकाळी दुष्काळी भाग होतं. पण गेल्या दोन वर्षांपासून येथे पाण्याची चांगली सोय झाली आहे. संपूर्ण गाव दुष्काळाच्या समस्येतून सावरलंय. याचं श्रेय नाशिकच्या एका खासगी महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक अशोक सोनवणे यांना जातं.

राज्यशास्त्राचे प्राध्यापक अशोक सोनवणे 2017 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध सार्वजनिक मंचांवर व्याख्यान दिलं. मी केटीएचएम कॉलेज, नाशिक येथे राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी होतो. जलसंधारणाच्या प्रयत्नांवरील माझ्या अनुभवामुळे मला अनेकदा व्याख्यानासाठी आमंत्रित केलं जायचं, असं त्यांनी सांगितलं.

2018 मध्ये मला देशवंडीमध्ये जलसंधारणावर व्याख्यान देण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. व्याख्यानानंतर गावातील तरुणांशी संभाषण सुरू झालं. संभाषणादरम्यान त्यांनी सांगितलं की गाव दुष्काळाच्या समस्येला तोंड देत आहे, असं अशोक यांनी सांगितलं

सर्व तरुण या समस्येबद्दल खूप चिंतित दिसत होते. मी सुचवलं की प्रवासादरम्यान मी पार केलेल्या दोन टेकड्यांवरून ही समस्या सोडवली जाऊ शकते. पावसाचं पाणी जमिनीवर कसं साठवलं जाऊ शकतं हे मी त्यांना सांगितल्याचं प्राध्यापक अशोक सोनवणे यांनी सांगितलंय.

गावात खूप कमी पाणी असताना या कोरड्या भागात पाणी कसं वाचवायचं हे विद्यार्थ्यांना माझ्याकडून जाणून घ्यायचं होतं. अशा आणखी काही चर्चा आणि अनेक भेटीनंतर डझनभर तरुणांसह पावसाचे पाणी गोळा करण्याचा पहिला प्रयोग केल्याचं त्यांनी सांगितलं.

ग्रामपंचायतीकडून परवानगी घेण्यात आम्हाला खूप त्रास झाला. खूप समजवल्यानंतर आम्हाला गावाभोवती सुमारे 32 हेक्टर जमीन मिळाली. लोकांनी त्यांचे फावडे आणि इतर साधने दिली आणि कामाला सुरुवात झाली. आम्हाला कडक उन्हात खोदायला सुरुवात करावी लागली. पावसाळ्यात खोदकाम करता येत नसल्याने अनेक शेतकरी आजूबाजूला पिके घेतात. त्यामुळे उत्खननाचे काम उन्हाळ्यातच पूर्ण करावं लागलं, असं अशोक सोनवणे म्हणालेत.

2018 मध्ये 500 मिमी पाऊस पडला आणि या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणी गोळा झालं. पावसाचं पाणी जमिनीत गोळा करण्यात आम्ही यशस्वी झालो. तसेच गेल्या दोन पावसाळ्यात गावात पाण्याचे टँकर बोलावण्याची गरज लागली नाही. जिल्हा परिषदेने गाव दुष्काळमुक्त क्षेत्र घोषित केल्याचं प्राध्यापक अशोक सोनवणे आनंदाने सांगतात.

दरम्यान, डिसेंबर महिन्यापासून गाव टँकरवर अवलंबून होतं. पण आता गावात पाण्याची पुरेशी सोय आहे. यामुळे परिस्थिती पूर्वीपेक्षा बरी झाली आहे. आता फार कमी लोक टँकरला कॉल करतात, असं सामाजिक कार्यकर्ता प्रवीण कार्दक यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील दोन-तीन दिवस पाऊस झोडपून काढणार

‘महेश मांजरेकर कोण आहेत?’; जितेंद्र आव्हाड संतापले

एनसीबीची आणखी एक मोठी धाड; रेव्ह पार्टीतून अभिनेत्याच्या मुलासह 10 जण ताब्यात

“विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजप सज्ज”

‘…तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही’; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More