Top News अहमदनगर महाराष्ट्र

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम प्रभावी होईल; ‘या’ खासदाराने व्यक्त केली खदखद

अहमदनगर | भाजप पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे या गोपीनाथ गडावरील दसऱ्याचा कार्यक्रम उरकून पुण्याला जात असताना माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवास्थानी थांबल्या होत्या. त्यावेळी दिलीप गांधी यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम प्रभावी होईल, असं म्हणत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

सर्वसामान्यांच्या नेतृत्वाचा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे चांगलात पुढे नेत आहेत. भाजप पक्षाने महामंत्रीसारखे मोठ्या जबाबदारीचे पद देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे, असंही त्यावेळी दिलीप गांधी म्हणाले.

त्यावेळी पंकज्या मुंडे म्हणाल्या की, “सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. शेतकरीही अतिवृष्टीमुळे संकटात सापडले आहे. राज्यसरकारने संकटकाळात जनतेला जास्तीत जास्त मदत करणे गरजेचे आहे”.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुरसान भरपाईसाठी जाहीर केलेल्या पॅकेजचे स्वागत करते, मात्र याहून अधिक पॅकेज देणे अपेक्षित असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेचा दसरा मेळावा हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो; आशिष शेलार यांची टीका

“महाविकास आघाडीचं सरकार कधी पडणार हे मुख्यमंत्र्यांना कळणारही नाही”

तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!

चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलं पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांचा दावा

उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही – कंगणा राणावत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या