पुण्यात मनसेला धक्का; कार्यकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये मनसेने भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र तरी देखील मनसेचे काही कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा प्रचार करताना आढळून आले होते. यातील सात कार्यकर्त्यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर कार्यकर्ते आक्रमक झालेत.

कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्यामुळे पुण्यात (Pune) मनसेला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे.

या पोटनिवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली असल्यानं भाजपचे बडे नेते कसब्यातच तळ ठोकून असल्याचं पहायला मिळत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-