बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कधीही न भेटलेल्या, 20 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या कैद्यासोबत महिला थाटणार संसार!

नवी दिल्ली | बऱ्याच वेळा आपण वेगवेगळ्या प्रेमकाहाण्या ऐकतो. मात्र यावेळीस एक अजबच प्रेमकहाणी समोर आली आहे. एका महिलेला एका कैद्यासोबत प्रेम झालं असून ही महिला आता त्या गुन्हेगारासोबत विवाह करणार आहे. विशेष बाब म्हणजे ही महिला आणि संबंधित कैद्यी आज पर्यंत एकदाही भेटले नाहीत. या घटनेनंतर एकच चर्चा रंगली आहे.

संबंधित महिलेचं नाव कैली असं आहे. कैली एका वेबसाईटसाठी काम करत होती. तेथे ती कैद्यांच्या अनुभवावर लेख लिहित होती. संबंधित कैद्याचे नाव जेम्स असं आहे. हळूहळू जेम्स आणि कैलीमध्ये ई-मेल, कॉल्स आणि लेटर्सच्या माध्यमातून ओळख वाढली आणि अशातच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. कैली जेम्सबद्दल असलेल्या भावना रोखू शकली नाही आणि यादरम्यान त्याने जेलमधून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून तिला प्रपोज केलं.

2012 मध्ये जेम्सने चारजणांची गोळी घालून हत्या केली होती. यामुळे त्याला 20 वर्षांची शिक्षा सुनावली असून 2023 मध्ये त्याची शिक्षा पुर्ण होणार आहे. जेव्हा कैलीने आई-वडिलांना याबाबत सांगितलं तर त्यांना सुरुवातीला धक्काच बसला. मात्र जेव्हा कैलीच्या पालकांनी जेम्सशी फोनवर बोलले तेव्हा त्यांनी लग्नासाठी होकार दिला. हे प्रेम प्रकरण दोन वर्षांपूर्वी सुरू झालं होतं.

दरम्यान, लग्नानंतरही दोघांना 10 वर्षांपर्यंत वेगळं राहावं लागेल. 2023 मध्ये जेम्सची तुरुंगातून सुटका होईल.या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघं लग्न करणार आहेत. कैलीने सांगितलं की, जेम्सने तिच्यासाठी जेलमध्येच एक रिंग तयार केली होती. त्यानंतर जेम्सने मित्राकडून कैलीला एक खरी अंगठी पाठवली.

थोडक्यात बातम्या-

तरूणाने संपूर्ण पाठीवर काढला शरद पवार यांचा टॅटू !

“छत्रपतींच्या गादीला डावलण्याचं काम करून भाजपने उदयनराजेंचा अवमान केला”

“लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात”

“कितीही बंदी घाला, मुले जन्माला घालण्यापासून कुणी रोखू शकणार नाही”

राज्यातील ‘या’ भागात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More