बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियातील ‘या’ तीन खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष

मुंबई | क्रिकेटमधील सर्वात रोमांचकारी विश्वचषकाला सुरूवात झाली आहे. जगातील सर्व माजी खेळाडू आपापल्या सर्वोत्तम खेळाडूंची नावं सांगत आहेत. सध्या भारतीय संघ हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय संघात अनेक ताकदवान खेळाडू आहेत. मात्र त्यापैकी काही खेळाडूंच्या कामगिरीवर जगातील सर्वांच्या नजरा आहेत.

भारतीय सलामीवीर के.एल राहुल सध्या जोरदार फाॅर्मात आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत राहुलनं 13 सामन्यात 30 षटकारांच्या सहाय्यानं 626 धावा केल्या आहेत. तर विश्वचषकातील आताच पार पडलेल्या सराव सामन्यात सुद्धा राहुलनं अनेक तुफानी खेळी केल्या आहेत. राहुल हा जागतिक टी ट्वेंटी क्रिकेटमधील सर्वात धोकादायक खेळाडूपैकी एक मानला जातो.

वरूण चक्रवर्ती सध्या अनेकांचं लक्ष आपल्याकडं वेधून घेत आहे. वरूणनं आपल्या चाणाक्ष गोलंदाजीनं आपलं कर्तुत्व सिद्ध केलं आहे. आयपीएलमध्ये भल्याभल्या स्फोटक फलंदाजांची आपल्या गोलंदाजीनं वरूणनं भंबेरी उडवली होती. वरूणनं टी ट्वेंटीमध्ये 6.40 या उत्कृष्ट सरासरानं गोलंदाजी केली आहे. परिणामी वरूणच्या गोलंदाजीचा करिष्मा आपल्याला या विश्वचषकात पाहायला मिळणार आहे. रविंद्र जडेजा हा अजून एक खेळाडू आहे ज्याच्या कामगिरीकडं सर्वांचं लक्ष आहे.

दरम्यान, रविंद्र जडेजा आपल्या अष्टपैलू खेळीनं जगातील सर्वांना अचंबित केलं आहे. शेवटच्या काही षटकात येऊन ताबडतोब फलंदाजी करण्यात जडेजा तरबेज आहे. सध्या भारतीय संघातील या तीन खेळाडूंसह सर्वांचाच धसका इतर संघानी घेतला आहे.

थोडक्यात बातम्या 

“कदाचित गांज्याची नशा उतरली नसल्यानं संजय राऊत…”

“समीर वानखेडेचा बाप बोगस होता, तुला तुरूंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही”

पुण्यातील बँकेवर फिल्मी स्टाईल दरोडा, घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद; पाहा व्हिडीओ

‘फडणवीसांची जिरवायची होती’?; वडेट्टीवारांच्या दाव्यावर नितीन गडकरींचं प्रत्युत्तर

‘शेतकऱ्यांची अडवणूक केली तर याद राखा…’; अजित पवारांचा थेट इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More