तंत्रज्ञान

जगातील ‘ही’ मोठी कंपनी TikTok खरेदी करण्याच्या तयारीत!

नवी दिल्ली | TikTok ने आख्या जगाला भुरळ घातली आहे. नुकतेच भारतात TikTok या चिनी अ‌ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेने देखील भारताच्या पावलावर पाऊल टाकायचं ठरवलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, मायक्रोसॉफ्ट हे अ‌ॅप खरेदी करू शकते.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यात असं म्हणलंय की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्य नडेला यांच्याशी बोलणं झालं आहे. मायक्रोसॉफ्ट अल्पसंख्या तत्त्वावर अमेरिकेला यातील काही हिस्सा खरेदी करण्यासाठी बोलावू शकते.

मायक्रोसॉफ्टने दिलेल्या निवेदनात असंही म्हटलंय की, सध्या अमेरिका सुरक्षिततेच्या बाबतीत खूपच चिंतेत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या हितासाठी मायक्रोसॉफ्ट TikTok खरेदी करण्याचा विचार करत आहे. TikTok ची बाईटडांस ही मूळ कंपनी ताब्यात घेण्यासाठीची सर्व चर्चा १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे, असं मायक्रोसॉफ्टने सांगितले आहे.

मायक्रोसॉफ्टने TikTok ला विकत घेतले तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या विविध देशांमध्ये वापरले जाणारे TikTok अ‌ॅप मायक्रोसॉफ्टच्या ताब्यात येणार आहे. याचबरोबर TikTok ने एक मोठं पाऊल उचललय. माहिती आणि ऍपच्या पारदर्शकतेसाठी TikTok अल्गोरिदम आणणार आहे, असं TikTok ने स्पष्ट केलंय. TikTok ने फेसबुकवर आरोप केलाय की, इन्स्टाग्राममधील रिल्सची सुविधा ही मूळ TikTok ची आहे. आम्ही अल्गोरिदम आणल्यावर जगाला दाखवून देऊ की, फेसबुकने इन्स्टाग्रामसाठी TikTok ची कॉपी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“हिंदूंना धडा शिकवण्यासाठी…”,आपच्या निलंबित नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा!

बिहार-महाराष्ट्र आमनेसामने, त्या प्रकरणावरून नितीश कुमार थेट ठाकरे सरकारशी बोलणार!

उद्या लॉन्च होतोय जबरदस्त फिचरसह रेडमीचा नवा फोन, किंमत असणार फक्त 10 हजाराच्या आसपास!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.