बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात कोरोना स्थितीचा वाईट काळ येणं अजून बाकी आहे- सुंदर पिचाई

नवी दिल्ली | देशात कोरोनानं अक्षरशः हाहाकार माजवलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. या परिस्थितीवर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी प्रतिक्रिया देत भारताला इशारा दिला आहे.

भारतात कोरोना स्थितीचा वाईट काळ येणं अजून बाकी आहे, असं सुंदर पिचाई यांनी म्हटलं आहे. ते सीएनएन या वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

भारताची कोरोनामुळे सध्या बिकट अवस्था आहे. अमेरिकेकडून भारताला मदत मिळत असल्याची चर्चा आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन भारतातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असंही सुंदर पिचाई यांनी सांगितलं.

दरम्यान, भारताला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून राज्यांना आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला वैद्यकीय मदत करण्यासाठी गुगलकडून 135 कोटींचा निधी पुरवला जाईल, अशी घोषणा केली. गिव्ह इंडिया, युनिसेफ, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही मदत पुरवली जाईल, असं सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

अवघ्या 32 वर्षीय IRS अधिकारी अनंत तांबेंचं कोरोनानं निधन!

दिलासादायक! पुण्यात आज कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जास्त

ममता बॅनर्जी यांची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड; 5 मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

‘आमच्याशी असं वागण्याची तुमची हिंमत कशी झाली?’; आयपीएल समालोचकाचा पंतप्रधानांना सवाल

‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला…’; अदर पुनावाला यांनी दिलं स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More