बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या नव्या प्रकाराने जगाची चिंता वाढवली, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

नवी दिल्ली | कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्यामुळे महाराष्ट्र कोरोना निर्बंध मुक्त करण्यात आला आहे. परंतु, अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोक वर काढलं आहे. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट्स निर्माण होत असल्याने संसर्गाचं प्रमाण वाढत आहे. ओमिक्रॉनच्या प्रकाराशी संबंधित नव्या प्रकाराने जगाची चिंता वाढवली आहे.

कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट आणि ओमिक्रॉन व्हेरियंटपासून तयार झालेला डेल्टाक्रॉन विषाणू हा कोरोनाचा पहिला रिकॉम्बिनंट आहे. नव्याने आढळून आलेला XE  हा प्रकार ओमिक्रॉनच्या B.A1 आणि  B.A2 चा रिकॉम्बिनंट स्ट्रेन आहे. जोपर्यंत या विषाणूचा संसर्ग आणि लक्षणे आढळून येत नाही तोपर्यंत कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरियंट मानण्यात येईल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

युकेमध्ये 19 जानेवारीला XE हा स्ट्रेन आढळून आला होता. त्यानंतर XE स्ट्रेनची 600 पेक्षा अधिक प्रकरणे समोर आली आहेत. XE सारख्या रिकॉम्बिनंटच्या धोक्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे, असं WHO ने म्हटलं आहे. या स्ट्रेनवर कोरोना प्रतिबंधक लसीची परिणामकारता आणि संरक्षण याविषयी अभ्यास सुरू आहे.

दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरियंटने चीनमध्ये कोरोना रूग्ण दुप्पट वाढत आहेत. चीनमधील शांघाय शहरात कोरोना रूग्ण वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्यात आला आहे. शांघायमधील 2 कोटींपेक्षा अधिक लोकांना या लॉकडाऊनचा सामना करावा लागणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांपेक्षा बेवड्यांची चिंता जास्त”

प्रवीण दरेकरांची पोलिसांकडून तीन तास चौकशी, बाहेर येताच दरेकरांचा सरकारवर हल्लाबोल

“मनसे बिनबुडाची झालीये, तिला बुडही नाही आणि शेंडाही नाही”

“न्यायालयाने भोंगे खाली उतरावायचे आदेश दिले आहेत त्याचं पालन करा आणि मग…”

अभिनेत्री सोनम कपूरचे बेबी बंप फ्लाॅन्ट करताना फोटो व्हायरल, पाहा फोटो

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More