बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जोधा अकबर’मधील ‘या’ अभिनेत्याचा जीव वाचवण्यासाठी कापावा लागला पाय

मुंबई | कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं पाहायला मिळत आहे. कोरोना महामारीनं अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेकांना औषधोपचारासाठीही पुरेसे पैसे नसल्याचं दिसतंय. अशातच आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘जोधा अकबर’मध्ये काम करणारे अभिनेते लोकेंद्र सिंह राजावत यांच्यावर कठीण परिस्थिती ओढावली असल्याचं पाहायला मिळत आहे.

अभिनेते लोकेंद्र सिंह राजावत गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना डायबिटीजमुळे त्यांचा पाय कापावा लागला आहे. त्यांचा जीव वाचवण्याचा हा एकच पर्याय असल्यानं डाॅक्टरांनी लोकेंद्र यांचा उजवा पाय कापला. लोकेंद्र यांना जिवंत राहण्यासाठी स्वतःचा पाय गमवावा लागला.

ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत लोकेंद्र म्हणाले, ‘मी काही करू शकत नाही. कोरोना महामारीपूर्वी माझं काम चांगलं चालू होतं. त्यानंतर काम मिळत नसल्यामुळं घरात राहून सतत आर्थिक तणाव असायचा.’

दरम्यान, पुढे मुलाखतीमध्ये लोकेंद्र सिंह राजावत यांनी सांगितलं की, माझ्या उजव्या पायात कॉर्न विकसित झाल्यानंतर परिस्थिती गंभीर झाली. मी दुर्लक्ष केलं. हा एक संसर्ग असल्याचं दिसून आलं, त्यानंतर काही दिवसात माझ्या संपूर्ण शरीरात पसरलं. तेव्हा स्वतःला वाचविण्यासाठी माझ्याकडे एकच पर्याय शिल्लक होता, तो म्हणजे पाय कापण्याचा.

थोडक्यात बातम्या –

चेहऱ्यावरच्या तेलकटपणासाठी ‘हा’ फेसपॅक अत्यंत गुणकारी

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; अशोक चव्हाणांनी दिली महत्वाची माहिती

आज सह्याद्रीवर बैठक पार पडणार, ठाकरे सरकार घेणार महत्वाचे निर्णय!

“मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो”

खेळत-खेळत चिमुकला आला रस्त्यावर, भरधाव वेगात मागून गाडी आली अन्…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More