काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला झाली कोरोनाची लागण, ट्विट करुन दिली माहिती
मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यातील रुग्णालये भरली असून बेड मिळविण्यासाठी रुग्णांना धडपड करावी लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काहींना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत: याविषयी ट्विटद्वारे माहिती दिली आहे.
सचिन सावंत यांनी ट्विट करून म्हटलं की, माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क परिधान करा. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या. यापूर्वी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, त्यांची आई रश्मी ठाकरे, तसंच मनसेचे आमदार राजू पाटील हेदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडले होते.
अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे नेहमी त्यांच्या मतदारसंघामध्ये सतत फिरत असतात. तसेच जनतेसोबत थेट संवाद साधत असतात. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून ते बरे देखील झाले होते. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल दुसऱ्यांदा पाॅझिटीव्ह आला आहे. त्यांनी स्वत: याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.
दरम्यान, मुंबईत पुन्हा ‘झिरो कोरोना’ मिशन सुरू झालं आहे. प्रशासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. मात्र, नागरिक नियमांची पायमल्ली करत असल्यामुळे कोरोना रूग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने, मुंबईकर आम्ही आपल्यावर नजर ठेऊन आहोत आणि ‘झिरो कोरोना’ मिशन साध्य करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करा आणि मास्कचा वापर करा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
माझी रॅपिड अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. सर्वांना विनंती आहे की मास्क घाला. आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.🙏
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 30, 2021
थोडक्यात बातम्या –
शरद पवार, अमित शहांच्या भेटीवर ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य; ‘आगे आगे देखो होता है क्या’
“संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात”
जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने देवेंद्र फडणवीस आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेणार???
‘कोरोनाचं संक्रमण वुहानच्या प्रयोगशाळेतून नव्हे तर…’; जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक दावा
शितल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यास सायबर तज्ज्ञांना अपयश; आत्महत्येमागचं गुढ कायम
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.