बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात दिल्या जाणाऱ्या ‘या’ लसीला ब्रिटनकडून मान्यता नाहीच!

नवी दिल्ली | कोरोनाचा कहर दिवसागणिक वाढायला लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तिसऱ्या लाटेची भीती अजूनही कायम आहे. लसीकरणाचा वेग वाढवल्यास संसर्गाचा प्रादुर्भाव बऱ्याच प्रमाणात रोखू शकतो. अशातच आता लसीकरणाविषयी मोठी बातमी समोर आली आहे.

भारतात दिल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीला मान्यता न देण्याचा निर्णय ब्रिटन सरकारनं घेतला आहे, त्यामुळे सध्या या निर्णयावर भारत सरकारकडून संताप व्यक्त केला जात आहे. भारतानं आक्षेप नोंदवल्यानंतर ब्रिटनकडून त्याची दखल घेण्यात आली आहे आणि लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

लसीकरण गरजेचं असल्यामुळे लोकांनी मिळेल ती लस घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र आता कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनादेखील ब्रिटनमध्ये सक्तीचं क्वारंटाईन सहन करावं लागणार आहे. ब्रिटन सरकारनं कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनादेखील ‘नॉट व्हॅक्सिनेटेड’ ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, प्रत्येक देशानं आपल्या देशासाठी काही ठराविक लसींना मान्यता दिली आहे. यामध्ये ब्रिटननंही आपल्या देशासाठी काही लसींची यादी केली आहे. या यादीमध्ये कोव्हिशिल्डचं नाव वगळलं आहे. ब्रिटनमध्ये भारतीय नागरिकांना प्रवेश जरी मिळणार असला, तरी त्यांना 10 दिवस विलगीकरणात राहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

तालिबानी सत्तासंघर्ष टोकाला, दोन्ही सर्वोच्च नेेते गायब

…मग राज्यपालांना एवढा अधिकार नाही का?- चंद्रकांत पाटील

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शहांची घेणार भेेट!

भाजपच्या ‘त्या’ 12 निलंबित आमदारांना निवडणुक आयोगाचा मोठा दिलासा

“राज्यपालांच्या डोक्यावरील टोपी ही विद्वत्तेची, त्यांनी विरोधकांचं थोबाड फोडलं पाहिजे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More