बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताला क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकून देणारा ‘हा’ खेळाडू करतोय रोजंदारीवर काम!

नवी दिल्ली | ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देणाऱ्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होताना दिसत आहे.तर दुसरीकडे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा मान उंचवणाऱ्या भारताच्या क्रिकेटपटूवर मजुरी करण्याची परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे सरकार आणि समाजाला अशा खेळाडूचा विसर पडला आहे की काय?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आपल्या देशात असे काही खेळाडू आहेत की त्यांची कारकीर्द संपल्यानंतर त्यांच्यावर दोन वेळच्या जेवणासाठी काम करण्याची वेळ आली आहे. असाच एक खेळाडू असून तो गुजरात राज्यातील नवसारी राहतो. नरेश तुमदा असं खेळाडूचं नाव आहे. नरेश हा भारताच्या अंध क्रिकेट संघाचा सदस्य राहिला आहे. 2018 साली अंध खेळाडूंच्या विश्वकप संघामध्ये नरेश महत्वाचा खेळाडू होता. दुबईत शारजाहच्या मैदानावर त्याने पाकिस्तान संघाविरूद्ध दमदार खेळी केली होती. अंतिम सामन्यात पाकिस्तानने दिलेल्या 308 धावांचा यशस्वी पाठलाग करताना नरेशने भारताला विश्वकप जिंकून दिला होता.

मात्र नरेशवर मजुरी करण्याचे दिवस आले आहेत. तो काम करून कुटुंबाला पोसत आहे. पोटाची भूक भागवण्यासाठी तो नवसारी शहरात दिवसाला 250 रूपये रोजंदारीवर काम करत आहे. भारताकडून विश्वचषक खेळलेल्या खेळाडूवर येणं ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.

दरम्यान, मी 250 रूपये दिवसाला कमवत असून मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे आतापर्यंत तीन वेळा गेलो आहे. मात्र अद्यापही मला कुणी मदत केली नाही आहे. मला एखादी सरकारी नोकरी मिळावी अशीही विनंती केली. परंतू मला अजूनही त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला नाही, असंही नरेशने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पावसाचं पुन्हा कमबॅक! राज्यातील ‘या’ 11 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

नीरज मराठाच, त्याच्या घरी मी जाऊन आलोय- खासदार संभाजीराजे

“400 कोटींच्या भूखंडासाठी रानडेचं स्थलांतर”, माजी विद्यार्थ्यांच्या आरोपांनी विद्यापीठात खळबळ

ईडीचा अविनाश भोसलेंना दणका, केली ‘ही’ मोठी कारवाई!

भाजप असं आडवं पडलं आहे की आम्ही इथून उठणारच नाही- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More