बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट

नवी दिल्ली | घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली की येणाऱ्या भल्या मोठ्या बिलाची काळजी लागून राहते. हॅास्पीटल (Hospital) आणि त्याचं बील पाहिलं की अगदी पैशाची चिंता लागते. कोरोनाच्या प्रार्दुभावमुळे अनेक ठिकाणी कॅशलेस सुविधेवर भर दिला जातो. यातच आता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी एक योजना आणली आहे. उत्तर प्रदेशातील 22 लाख सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक तसेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांना कॅशलेस सुविधेचं मोठं गिफ्ट दिलं आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकभवन सभागृहात पंडित दीनद्याल उपाध्याय राज्य कर्मचारी कॅशलेस वैद्यकीय योजनेची सुरूवात केली. ते म्हणाले, हे सर्व कर्मचाऱ्यांच्या कष्टाचं फळ आहे. ते आपल्या सरकारमधील एक भाग आहेत. त्यांची काळजी करणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जनतेची काळजी घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे. जनतेला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी. कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे युपीची अर्थव्यवस्था (economy) पुढे जात आहे, असंही ते पुढे म्हणाले.

स्टेट हेल्थ कार्डच्या (State Health Card) माध्यामातून राज्य सरकारी कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्यावर अंवलबून असलेल्यांना आयुष्यमान भारत अंतर्गंत नोंदणीकृत सर्व वैद्यकीय महाविद्यालये, सरकारी रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांंमध्ये वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत, असं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक म्हणाले.

कार्ड बणवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे कार्ड कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर मिळावं, असं वक्तव्य उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री (Minister of Health) मयंकेेेेेेेेेेेश्वर शरण सिंह यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या

मंत्र्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले

झपाट्याने पसरणाऱ्या मंकीपॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर!

‘अनिल परबांचा फोन तपासा…’; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

‘या’ लोकांना दारूपासून जास्त धोका; अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर

“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More