“योगी पुढे जाणार हे नक्की होतं, पण….”; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
नवी दिल्ली | पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. सगळ्यांच लक्ष आज या पाच राज्यांकडे लागलं असून मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे.
एग्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजप तब्बल 240 जागांनी आघाडीवर असल्याचं पहायला मिळत आहे. मजमोजणीचा कौल भाजपकडे दिसत असल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांनी आत्ताच जल्लोष करायला सुरुवात केली आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
योगी पुढे जाणार हे नक्की होतं, पण अखिलेश यादव यांची चांगली कामगिरी असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. उत्तर प्रदेशचा निकाल जाहीर झाल्यानंतर यावर काही बोलणं योग्य ठरेल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, समाजवदी पार्टी यूपीमध्ये 108 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्ष 1 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता 5 नंतर निकाल काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
“छत्रपतींचा विचार म्हणजे रात्री गाड्या फिरवायच्या, मोठ्याने गाणी लावायची असं आहे का?”
युद्ध सुरू असतानाच रशियाने केली ‘ही’ मोठी घोषणा!
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांची प्रकृती गंभीर
रशिया युक्रेनवर ‘हा’ मोठा हल्ला करण्याच्या तयारीत?, अमेरिकेने दिला सतर्कतेचा इशारा
भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत, गोव्यात मुख्यमंत्री कोणाचा?
Comments are closed.