बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सॅल्यूट! कोरोनानं पालक गमावलेल्या 100 मुलांची जबाबदारी ‘या’ तरुणानं घेतली

देहरादून | देशात अनेक लहान मुलांनी आपल्या आई आणि वडील अशा दोघांनाही कोरोनामुळे गमावलं आहे. अशा मुलांच्या भवितव्यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. पण त्याचसोबत काही सामाजिक संस्था देखील पुढे येत आहेत.

देहरादूनचा जय शर्मा देखील एक असाच समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवणाऱ्यापैंकी एक तरुण आहे. त्यानं कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 100 चिमुकल्यांचं पालकत्व स्वीकारलं आहे. जय शर्मा हा तरुण ‘जस्ट ओपन युवरसेल्फ’ या सामाजिक संस्थेचा संस्थापक आहे.

जय शर्मा चालवत असलेल्या सामाजिक संस्थेकडून कोरोना काळात आजवर विविध माध्यमांतून मदत करण्यात आली आहे. यात मोफत ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देणं, कोविड मेडिकल कीट, सॅनिटायझेशन किट्स आणि इतर वैद्यकीय उपकरणं उपलब्ध करुन देण्याचं काम करण्यात आलं आहे.

आपल्या संस्थेच्या फेसबुक पेजवर कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या एकूण 100 मुलांचं पालकत्व स्वीकारणार असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा करण्याआधीच जयनं 20 मुलांचं पालकत्व याआधीच स्वीकारलं आहे. जय शर्माच्या या कामाचं कौतुक करावं तितकं कमी आहे.

थोडक्यात बातम्या-

‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या; चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

बंडातात्या कराडकर यांना समजावण्यात अखेर पोलिसांना यश; पायी वारीचा निर्णय मागे

ब्रेकिंग! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला, पुन्हा कडक लॉकडाऊन

‘…तर मला आधी मुख्यमंत्रिपदावर बसवा’; छत्रपती संभाजीराजे भोसलेंचं मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More