बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! युवा गोल्फपटूने कोरोना लसीकरणासाठी दिली आतापर्यंतची सर्व कमाई

मुंबई |  देशभरात कोरोनाचं संकट वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचं भयावह चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यातच सरकारकडून लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात देशभरात राबविण्यात येत आहे. अनेक बड्या उद्योगपतींकडून मदतीचा हात या संकटाशी दोन हात करण्यासाठी मिळाल्याचं गेल्या काही दिवसात आपण पाहिलं. त्यातच आता एका युवा गोल्फपटूने कोरोना लसीकरणासाठी मोठं पाऊल उचललं आहे.

युवा गोल्फपटू कृषीव टेकचंदानी या अवघ्या 19 वर्षाच्या गोल्फ खेळाडूने आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कमावलेली बक्षिसांची संपूर्ण रक्कम कोरोना लसीकरणासाठी दान देण्याची घोषणा केली आहे. कृषीवच्या या घोषणेमुळे त्याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

सात वर्षाचा असल्यापासून कृषीव गोल्फ खेळतो. तेव्हापासून आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पारितोषिके पटकावली. पण देशावर सध्या कोरोनाचं महाभयंकर संकट घोंगावत असल्याने लसीकरणाला वेग मिळावा आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण होऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी या उद्देशाने कृषीवने मुंबईच्या चेंबूर येथील स्थानिक गोल्फ क्लबच्या लसीकरण मोहिमेसाठी आजवरची कमावलेली सर्व कमाई दान करण्याचं निश्चित केलं आहे.

कोरोनाच्या संकट काळात मदत करणं हे आपलं कर्तव्यच असल्याचं यावेळी कृषीव याने बोलून दाखवलं. आपल्या जन्मदिनाचे औचित्य साधत कृषीव टेकचंदानी या युवा गोल्फपटूने लसीकरणासाठी सर्व कमाई दान करत लसीकरण मोहीम राबवण्यासाठी पुढाकार घेतल्याने त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या –

इंजेक्शन-औषध मिळत नाहीत?, #MahaCovid हॅशटॅग वापरुन एक ट्विट करुन पाहा

‘कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसात खाल्ला’; प्रविण तरडेंना अश्रू अनावर

गोपीचंद पडळकरांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं, म्हणाले…

महाविकास आघाडीमध्ये श्रेय वादाची लढाई?; मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

‘…हे आम्हाला अजिबात आवडलं नाही’; बाळासाहेब थोरात मित्रपक्षांवर भडकले

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More