बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक्क एका कोंबडीने मगरीला कसा दिला चकवा, पाहा मजेशिर व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर खूप प्राण्यांचे शिकारीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ तर पाहूनच अंगावर काटा येईल असे असतात. आपल्याला माहित आहे की, मगर ही खूप चपळ असते. जरी ती पाण्यातच असली तरी ती शिकार करण्यात खूप तरबेज असते. तसेच तिला कोणी पाण्याच्या जवळ येत असल्याची चाहूल लगेचच लागते.

एकदा मगरीने ठरवलं की, ती त्या प्राण्याची शिकार केल्याशिवाय त्याचा पिछा सोडत नाही. परंतू, तुम्ही कधी कोंबडीला एका भल्या मोठ्या प्राण्याची शिकार करताना पाहिलं आहे का? अशातच यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क कोंबडीने मगरीला चकवा दिला आहे.

व्हिडीओमध्ये एका नदीच्या पाण्यात मगर निम्मी पाण्यात व निम्मी किनाऱ्यावर निपचित पडलेली आहे. तिच्या अंगावर कोंबडी इकडून-तिकडं उड्या मारताना दिसत आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहित आहे की, मगर पाण्यात आलेल्या कोणत्याच प्राण्याला सोडत नाही. त्यामुळे तिच्यासमोर जायची कोणी हिंमतही करत नाही. परंतू, या व्हिडीओमधील कोंबडी बिंदास्तपणे त्या मगरीच्या शरिरावरून दुसरीकडे जात आहे.

मगरीची सहनशक्ती संपल्यानंतर तिने आपलं तोंड उघडलं आणि त्या कोँबडीवर झडप घातली. मात्र कोंबडी मगरीपेक्षा अधिक चलाक असल्यामुळे कोंबडी त्या मगरीच्या तावडीतून सुटली असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. तसेच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, अनेकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

पाहा व्हिडीओ- 


थोडक्यात बातम्या-

पत्नीच्या चारित्र्यावर पतीला आला संशय अन् घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

जालन्यात डीवायएसपी आणि सात ते आठ पोलिसांचा भाजप पदाधिकाऱ्याला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल

कोरोनापासून बचाव करण्यासाठी युवकाचा अनोखा जुगाड, पाहा व्हिडीओ

धक्कादायक! इंटरनेटवर हत्या कशी करायची सर्च करून, दुसऱ्या दिवशी पत्नीचीच केली हत्या

ना परिक्षा ना मुलाखत, महाराष्ट्र पोस्टात नोकरीची संधी; पगारही चांगला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More