बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, तरुणानं शेअर केला धक्कादायक अनुभव

कोल्हापूर | कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांना लूटलं जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरात एका नागरिकाला मास्क घातला असताना सुद्धा लायसन्स आणि नंतर मास्कचं कारण पुढे करत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने आणि ट्रॅफिक हवालदाराने दंडाची पावती फाडायला सांगितली. पण मी मास्कचा नियम पाळलाय हे सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तींनी आवाज चढवत अरेरावीचा भाषा केल्याचं या नागरिकाने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. गौरव काईंगडे असं तरूणाचं नाव असून त्याने घडलेला प्रकार फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला आहे.

 

आज सकाळी साडेअकरा- बारा वाजता अत्यावश्यक कारणासाठी कणेरी मठाकडे टू- व्हीलरवरुन जात असताना हाय-वे लगतच्या कमानीजवळ ग्रामपंचायतीच्या दोघा कर्मचाऱ्यांनी मला अडवले.. मास्क घातला असताना सुद्धा अडवल्यामुळे मी प्रथम गोंधळलो..
ग्रामपंचायत कर्मचारी : लायसन दाखवा..
मी : का ? तुम्हांला कशासाठी दाखवायचे लायसन ?
कर्मचाऱ्याने आतल्या बाजूने बोटाचा इशारा करताच गुहेतून ढाण्या वाघ बाहेर यावा तसा एक ट्रॅफिक हवालदार अर्धवट शटर वर ढकलत एका दुकान गाळ्यातून बाहेर आला..
ट्रॅफिक हवालदार : काय झालं ? दाखवा की लायसन..
मी : लायसन नाहीये साहेब..
ट्रॅफिक हवालदार : ए ह्यांची शंभर ची पावती फाडा रे..
मी : (मी काहीही न बोलता फक्त मानेनेच होकार दिला..)
ट्रॅफिक हवालदार : अजून का नाही काढलं लायसन ?
मी : तीन वेळा प्रयत्न केला होता साहेब.. लायसन काढायचा.. पण तुमच्या आरटीओ ऑफिसमधले एजंट आणि अरेरावी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या युतीसमोर माझा टिकाव नाही लागला.. म्हणून आता पुन्हा तिकडे फिरकायचेच नाही असे मी ठरवले आहे.. तुम्हीं करा पावती.. माझी काही हरकत नाही..
..आणि त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने मला पावती दिली.. पावतीवर लिहिले होते.. #विनामास्क !!! माझं डोस्कचं सनकलं 🤬
मी : हा काय प्रकार आहे ? लायसन नाही म्हणून पावती फाडताय मग विना मास्क का लिहिले आहे इथं ? आणि मला रितसर आरटीओ ची पावती द्या ना.. ग्रामपंचायतीची पावती का देताय ?
ट्रॅफिक हवालदार : मग दोनशे रुपये भरावे लागतील..
मी: अहो दोनशेच काय.. पाचशेची फाडा.. पण मला रितसर पावती पाहिजे..
ट्रॅफिक हवालदार : पैसे द्या.. आणि तुमचा पत्ता देऊन ठेवा.. पावती पोस्टाने पाठवली जाईल.. आत्ता ते पावती बुक शिल्लक नाहीये..
मग मात्र मी पैसे परत काढून घेण्यासाठी हुज्जत घालू लागलो.. आणि मग तिथे खाकी वर्दीतल्या पोलीसमामांचीही गर्दी वाढू लागली.. ते सुद्धा त्या अर्धवट शटर उघडलेल्या दुकानातून एक एक करत बाहेर येऊ लागले.. आणि कोविड तपासणी करुन क्वारंटाईन व्हायला लागेल म्हणून दबाव टाकू लागले.. अर्थात हे सगळं झुगारुन मी माझे लाखमोलाचे शंभर रुपये परत घ्यायचे तसे घेतले(च)..
पण..
काय प्रकार चालू आहेत हे ?
ही असली लूट ते ही आमच्या कोल्हापुरात !!?
आमच्या मेंदवात थोडीफार अक्कल आहे म्हणून आम्हाला हे जमलं पैसे परत काढून घ्यायला.. पण दिवसभरात असे किती अडाणी लोकांना लुबाडत असतील हे हरामखोर ?
तो ट्रॅफिक हवालदार ग्रामपंचायतीच्या पावत्या का फाडत होता ??
त्या पावतीवर कणेरी ग्रामपंचायतीचा जरी शिक्का मारला असला तरी ना कुणाची त्या पावतीवर सही होती ना दिनांक..
पावतीवर #सामान्य_पावती लिहिले आहे म्हणजे हे पैसे नेमके जातायत कुठे..???
“लायसन नाही म्हणून क्वारंटाईन व्हायचं..” हा कुठला कायदा ?
आणि हो.. सर्वांत महत्वाचे हे की, हे सगळे पोलिस अधिकारी आपली ड्युटी सोडून शटर बंद करून त्या दुकान गाळ्यात काय करत होते ?
डॉक्टरांबरोबरच पोलिस आणि पालिका/पंचायत कर्मचाऱ्यांचा कोल्हापूरकरांनी #कोविडरक्षक म्हणून जयजयकार करून अक्षरशः वर्षभर डोक्यावर घेतले होते. पण हे असले चिरीमिरीधारी #कोविडभक्षक अधिकार्यांना कोल्हापूरकरांनी‌ असेच सहन करायचे काय ?
कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे..
-गौरव काईंगडे

 

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाने उद्धवस्त केला नवदाम्पत्याचा संसार; अवघ्या तीन दिवसात नवरदेवाला कोरोनाने गाठलं

‘…तर आज ही वेळ ओढावली नसती’; अजित पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

#सकारात्मक_बातमी | हृदयात बिघाड असलेल्या 2 महिन्याच्या बाळाने कोरोनाला केलं चितपट

“महाराष्ट्र लढवय्या, महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही”

“कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर संजीवनी नाही, अनेक जण रेमडेसिवीर न घेताही बरे झालेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More