बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घरात विलगीकरणासाठी जागा नाही; तरूणाने 11 दिवस झाडावर काढले

हैदराबाद | तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यात एका तरुणालाही कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्याला क्वारंटाईन होण्याची गरज होती. मात्र क्वारंटाईनची सुविधा उपलब्ध नसल्याने या तरुणाने घराशेजारील झाडावरच बसून 11 दिवस क्वारंटाईनमध्ये राहिल्याची माहिती पुढे आली आहे. कोठानंदीकोंडा या गावातील ही घटना आहे.

शिवा असं या तरूणाचं नाव आहे. तो 18 वर्षांचा आहे. कोठानंदीकोटा गावात राहणाऱ्या शिवाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला घरातच क्वारंटाईन व्हायला सांगितलं होतं. मात्र घर लहान असल्याने शिवाला तिथं राहणं शक्य नव्हतं.

शिवाला घराशेजारच्या झाडावरच क्वारंटाईन होण्याची शक्कल सुचली. बांबूच्या साहाय्याने शिवाने झाडावर एक लहानशी मचाण तयार केली आणि त्यावरच बसून 11 दिवस काढले.

आमच्या गावात विलगीकरण केंद्र नाही. माझ्या कुटुंबात चार जण राहतात. त्यांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. गावातील काही जणांना सरपंचांना याबाबत सांगितलं. मात्र ते मदतीसाठी पुढे आले नाहीत. गावातून अन्य कुणीही मदतीला आलं नाही. सर्वजण कोरोनाला घाबरून घराबाहेरच पडत नाहीत. एक बादली दोरीला बांधून त्यातून अन्नपदार्थ आणि अन्य गरजेच्या गोष्टी घेतल्या, असं शिवाने सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

सलमान माझे बूट व कपडे सांभाळायचा, मीच त्याला… जग्गूदादाचा मोठा खुलासा

‘तूफान तो इस शहर में अक्सर आता है’; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

सरकारची कोरोना हाताळण्याची पद्धत चुकीची, प्रसिद्ध शास्त्रज्ञानं दिला राजीनामा

वेड्या आईची वेडी माया!, लेकराला वाचवण्यासाठी गायीची विहिरीत उडी

मोदींविरोधात पोस्टर लावले, पोलिसांकडून 100 जणांना अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More