बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिलेला मधलं बोट दाखवणं भोवलं; न्यायालयाने तरूणाला घडवली चांगलीच अद्दल

मुंबई | महिलेची छेड काढणं तरूणाला चांगलच भोवलं आहे. ट्रॅफिक सिग्नलवर (Signal) झालेला वाद न्यायालयात पोहोचला. सिग्नलवर थांबलेल्या महिलेला मधलं बोट दाखवणं तरूणाच्या अंगलट आलं आहे. न्यायालयानं तरूणाला शिक्षा सुनावत चांगलीच अद्दल घडवली आहे.

सप्टेंबर 2018 रोजी 66 वर्षीय महिला तिच्या मुलासह कारमधून जात होती. कार कॅडबरी जंक्शन जवळ असता एक लाल रंगाची गाडी त्यांच्या गाडीला खेटुन थांबली. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न झाल्यावर फिर्यादी महिला आणि त्या कार मधील 32 वर्षीय तरूणामध्ये शाब्दिक वाद झाला.

त्या तरूणाने महिलेला शिवीगाळ करत मधलं बोट दाखवल्याने प्रकरण आणखी चिघळलं आणि वाद न्यायालयात गेला. यावेळी पिडीत महिलेच्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारावर हल्ला झाल्याचं मत न्यायालयाने नोंदवलं व तरूणाला 6 महिन्यांचा तुरूंगवास व 1 हजार रूपयांचा दंड ठोठावला.

माफिनामा लिहून तरूणाची सुटका करण्याच्या युक्तीवादही कोर्टाने फेटाळला. आरोपी तरूणाला असंच सोडून दिलं तर समाजाला चुकीचा संदेश जाईल, असंही दंडाधिकारी न्यायालयानं (Magistrate Court) स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! Omicron वर औषध सापडलं, शास्त्रज्ञांचा दावा

डेल्टापेक्षा omicron किती घातक?; ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

“संजय राऊत एक नंबरचे डबल ढोलकी, खुर्ची टिकवण्यासाठी…”

महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, ‘इतक्या’ हजार कोटी जणांना मिळणार नोकऱ्या!

Royal Enfield च्या नव्या बाईकचा जलवा; 2 मिनिटांत विकल्या गेल्या सर्व बाईक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More