बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रेयसीने न सांगता लग्न उरकल्याने तरूण गेला टेकडीवर अन्….; पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल!

मुंबई | प्रेमभंग झाल्यावर अनेक तरूण-तरूणी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रकारच्या बातम्या आपण नेहमी माध्यमांमधून वाचत असतो. असाच एक प्रकार वसईत घडला आहे. प्रेमभंग झाल्यामुळे आपली जीव द्यायला निघालेल्या तरूणाचा जीव पोलिसांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यामुळे तरूणाच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास घेतला.

मुंबईत राहत असलेल्या 27 वर्षीय तरूणाचं वसईतील एका मुलीसोबत लग्न ठरलं होतं. मात्र तरूणीने त्या तरूणाला काहीही न सांगता दुसऱ्यासोबत गुपचूप लग्न उरकून घेतलं. हा सगळा प्रकार त्या तरूणाला समजल्यावर तो तरूणीच्या गावात म्हणजेच वसई पूर्व भागातील नवजीवन झोपडपट्टी येथील गावदेवी मंदिर टेकडीवर तो आपलं जीवन संपवायला गेला होता.

आत्महत्या करायला निघालेल्या तरूणाची माहिती मीरा भाईंदर वसई विरार अतिरिक्त पोलीस आयुक्त जयकुमार यांना मिळाली. जयकुमार यांनी तत्काळ पावलं उचलत सकाळी सव्वा अकरा वाजता वालीव पोलिसांना कळवलं. लगेच प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी बालाजी गायकवाड आणि सचिन बळीद यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरूणाचा जीव वाचवला.

दरम्यान, गावदेवी मंदिर टेकडी ही अडीच हजार फूट उंचावर आहे. त्यामुळे या टेकडीवर जाण्यासाठी जवळपास 200 पायऱ्या चढाव्या लागणार होत्या. गायकवाड आणि बळीद यांनी त्या तरूणाला फोन करून तरूणाला फोनमध्ये गुंतवून ठेवलं आणि वेळेच्या आधीच दोघेजण घटनास्थळी दाखल झाले आणि तरूणाला आत्महत्या करण्यापासून रोखलं. त्यानंतर पोलिसांनी तरूणाचं समुपदेशन करून त्याला घरच्यांकडे सोपवलं.

थोडक्यात बातम्या-

नारायण राणेंच्या गाडी चालकाचा मृत्यू, कुटुंबियांनी केले ‘हे’ गंभीर आरोप!

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना लुकआऊट नोटीस?; फडणवीस म्हणाले…

बेळगाव महापालिकेवर कर्नाटक भाजपचा झेंडा, संजय राऊतांचं स्वप्न भंगलं!

‘काही माथेफिरू लोकांच्या विचारातून…’; आरएसएसच्या टीकेवर Infosysच्या माजी अधिकाऱ्याचं प्रत्युत्तर

शिवसेनेसह सर्व राजकीय पक्षांना आवाहन, गर्दी करणारे कार्यक्रम नकोच- उद्धव ठाकरे

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More