बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑन ड्यूटी असताना आराम करणाऱ्या डॉक्टरला तरुणीने लगावली कानशिलात!

नवी दिल्ली | कोरोना काळात डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी रात्रं-दिवस काम करत आहेत. अशातच हरियाणाच्या हिसारमध्ये एका तरुणीने डाॅक्टरच्याच कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. ऑनड्यूटी असणारा डाॅक्टर आराम करत असल्याचं पाहून तरुणीने हे कृत्य केलं असून संबंधित तरुणीवर कारवाई करण्यात आली आहे.

हिसारमधील एका रुग्णालयात तरुणी आणि एक तरुण आपल्या नातेवाईकाला घेऊन उपचारासाठी रुग्णालयात गेले होते. तेथे डाॅक्टर उपस्थित नसल्याने बराच वेळ वाट बघून आणि शोध घेऊन देखील डाॅक्टर आले नाही. या दरम्यान डाॅक्टर आणि एक व्यक्ती खोलीत झोपताना दिसले. तरुणीने तातडीने फोन काढून हा घटनाक्रम मोबाईलमध्ये रेकाॅर्ड केला.

ऑनड्यूटी तुम्ही आराम कसं करताय?, असा सवाल तरुणीने डाॅक्टरांना विचारला. यानंतर डाॅक्टर रागात तेथून निघून आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. तरुणीने व्हिडीओ अनिल विज यांना पाठवण्याची धमकी दिली. यानंतर डाॅक्टरांनी तरुणीकडून फोन खेचला. यावेळी आपला फोन परत करण्यास तरूणीने सांगितलं.

दरम्यान, संबंधित तरुणीला आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलीस आता याबाबत अधिक तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

साऊथ इंडियन अभिनेत्रीचा भीषण अपघात, मित्राचा जागेवर मृत्यू, ‘ही’ होती गाडी

“माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बॉलिवूडकरांनी जरा संवेदनशील व्हावं”

भारताला मोठा धक्का, सानिया-अंकिताची जोडी पहिल्याच फेरीत बाहेर

‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाही’; अजित पवार भडकले

कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही तर…- भरत जाधव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More