बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठ्या भावाला वाचवण्यासाठी छोट्या भावाची पाण्यात उडी; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

भंडारा | कधी काय घटना घडेल याचा काही नेम नसतो. दुर्घटना कधीही आणि कोणासोबतही घडू शकते. यातच भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द येथील दोन सख्ख्या भावंडांचा सेल्फी काढण्याच्या नादात मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.

स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगेश मधुकर जुनघरे आणि विनोद मधुकर जुनघरे दोन सख्खे भाऊ नागपूर येथील राहणारे रहिवासी असून गोसीखुर्द धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. तेथे सेल्फी काढण्याच्या नादात एकाचा तोल ढासळला. भावाला वाचवण्यासाठी दुसऱ्यानंही पाण्यात उडी घेतली. मात्र पोहोता येत नसल्यानं दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

सेल्फी काढताना पाय घसरलेल्या एका भावाला वाचवताना दुसऱ्यालाही प्राण गमवावा लागला. अजूनपर्यंत या दोघांचेही मृतदेह मिळालेले नाहीत. त्याचं तपासकार्य सुरु आहे. दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू झाल्यानं उमरेडमध्ये शोककळा पसरली आहे.

दरम्यान, अशा प्रकारच्या अनेक घटना समोर येत असतात. सेल्फी घेताना, कुठे फिरायला गेल्यावर अशा प्रकराच्या धक्कादायक घटना घडत असतात.

थोडक्यात बातम्या –

अफगाणिस्तानात आतापर्यंत काय काय घडलं?, वाचा एका क्लिकवर

चक्क खासदारच विसरले राष्ट्रगीत; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

देश सोडण्यासाठी अफगाणी नागरिकांची धडपड, विमानतळाचे फोटो पाहून हैराण व्हाल

15 ॲागस्टची सुट्टी ठरली दुर्देवी, मुलाच्या डोळ्यादेखत आईनं सोडला जीव

‘…म्हणून मला देश सोडावा लागला’; अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी सांगितलं कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More