बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सख्खे भाऊ पक्के वैरी; आई-वडिलांसमोरच लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

बीड | बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील एका तरुणाने आई-वडिलांसमोरच त्याच्या सख्या मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई-वडीलांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र ते अयशस्वी ठरले. जागेचे भाडे घेण्यावरुन भावांमध्ये वाद पेटला होता.

शेख ईर्शाद शेख शकील असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव असून शेख हर्षद शेख शकील असं आरोपीचं नाव आहे. ही घटना पात्रुड गावात घडली आहे. जागेच्या भाड्यावरुन दोघा भावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. मात्र या किरकोळ वादाचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं. यादरम्यान शेख हर्षदने धारदार शस्त्राने मोठ्या भावावर सपासप वार करुन त्याचा खून केला.

मोठा भाऊ मृत झाल्याचं समजताच शेख हर्षदने स्वतःने पोलिस ठाण्यात हजेरी लावून संपुर्ण घटनेची माहिती दिली. या प्रकरणात आई एकाच्या बाजूने तर वडील दुसऱ्याच्या बाजूने असल्याचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. मृत झालेल्या शेख ईर्शादच्या पत्नीने लहान दिराच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली आहे. तसेच सख्खा भाऊ पक्का वैरी ठरल्याचं या प्रकरणातून दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाकाळात देशातील 10 हजार कंपन्या बंद; महाराष्ट्रातील आकडा पाहून व्हाल थक्क!

अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण!

एकाच मुलीवर प्रेम जडलेल्या दोन तरूणांनी उचललं धक्कादायक पाऊल!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत!

‘…म्हणून इंधनाच्या कार वापरणार नाही’; नितीन गडकरींनी वळवला इलेक्ट्रिक कारकडे मोर्चा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More