बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तरूणाने संपूर्ण पाठीवर काढला शरद पवार यांचा टॅटू !

मुंबई | बारामतीतील एका तरूणाने आपल्या संपूर्ण पाठीवर शरद पवार यांचा टॅटू काढला आहे. हा टॅटू पर्मनंट म्हणजेच कायमस्वरुपी आहे. अक्षय साळवे असं टॅटू काढलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे.

विधानसभा निवडणुकांच्या वेळी साताऱ्यामध्ये शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली होती. या सभेत पाऊस आल्यानंतरही शरद पवारांनी पावसात भिजत सुरु ठेवलेले भाषण प्रचंड गाजलं होत. यामुळे अनेक जण प्रभावित झाले होते. हे दृश्य पाहून अक्षयही भारावून गेला होता. त्याच वेळी अक्षयने मुंबईत हा टॅटू काढून घेतला होता.

आपल्या पाठीवरील ही कारागिरी खुद्द शरद पवार यांनी पाहावी, अशी अक्षयची इच्छा होती. गेली दीड वर्ष तो शरद पवार यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता. अखेर रविवारी अक्षयला पवारांची भेट घेता आली. यावेळी शरद पवारांनीही अक्षयचं कौतुक केल्याचं कळतंय.

संदीप जोशी या कलाकाराने हा टॅटू अक्षयच्या पाठीवर काढला. अक्षय हा मूळचा बारामती तालुक्यातील मेदड गावचा रहिवासी आहे. तो सध्या मुंबईत व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“छत्रपतींच्या गादीला डावलण्याचं काम करून भाजपने उदयनराजेंचा अवमान केला”

“लोकसंख्या अनियंत्रित करण्यात आमिर खानसारख्याच लोकांचा हात”

“कितीही बंदी घाला, मुले जन्माला घालण्यापासून कुणी रोखू शकणार नाही”

राज्यातील ‘या’ भागात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा!

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या ‘त्या’ वक्तव्याला शरद पवारांचा पाठिंबा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More