मुंबई | दसऱ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला संबोधित केलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत खास तरूणांना आवाहन केलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “लॉकडाऊनच्या काळात आपण रोजगाराच्या मुद्द्यावर भर दिला असून अनेक कंपन्यांशी करार केले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक करण्यात येतेये. म्हणून राज्यातील तरुणांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी.”
याशिवाय मी राज्यातील भूमिपुत्रांना आवाहन करतो की, मला तरूण वर्ग हा द्योगधंदे करताना दिसले पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणालेत.
उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसार, मोठे उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करायला इच्छुक आहेत. त्यामुळे भूमिपूत्रांनी काम करण्याची तयारी ठेवावी. कष्ट करण्याची जिद्द असल्यास स्थानिक तरुणांना रोजगारापासून वंचित राहावं लागणार नाही.
महत्वाच्या बातम्या-
“भाजपवाल्यांनो भाडोत्री बाप तुम्हालाच लखलाभ असो, माझा बाप हा महाराष्ट्र आहे”
“भेदभाव करून सरकार चालवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”
काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या- उद्धव ठाकरे
कुणी कितीही चिखलफेक केली तरी आमचं सरकार पाच वर्ष टिकणार, कारण…- संजय राऊत
“छाताडावर गोळ्या झेलून अतिरेक्यांना पकडणारे माझे पोलीस, मला त्यांचा प्रचंड अभिमान”
Comments are closed.