बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनानं अख्खं गाव सुतकात; तरूणांनी केली कमाल अन् गावासाठी उभारलं कोविड सेंटर

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर ( 3.5% ) हा देशात सर्वात जास्त आहे. कोल्हापुरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे आता कोल्हापूरचे लोक पुणे आणि मुंबईसारख्या शहरात उपचारासाठी येताना दिसत आहे. पण या शहरांमध्ये अधिक रूग्णसंख्या जास्त असल्यानं तिथेही त्यांना बेड मिळेना झाला आहे. त्याच आता कोल्हापूरच्या तरूणांनी कमाल करत कोविड सेंटरच उभा केलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या करवीर तालुक्यातील गिरगाव गाव सध्या सुतकात आहे. या गावात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सैनिकांचं गाव म्हणून या गावाची ओळख आहे. कारगिलच्या लढाईत पराक्रम गाजवणाऱ्या एका माजी सैनिकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. याशिवाय मागच्या आठवड्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या तरुण मुलाचा दोन दिवसापूर्वी कोरोनाने निधन झालं आहे. त्याशिवाय एक आजी आणि तिचा नातूही कोरोनाने गेला आहे.

गावात मृत्युची साखळी सुरूच असल्यानं तरूणांनी पुढाकार घेतला. गावासाठी त्यांनी अख्खं कोविड सेंटर उभा केलं. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रुपेश पाटील यांनी पुढाकार घेऊन गावातील तरुणांच्या साथीने आश्रमशाळेत हे कोविड सेंटर उभारलं आहे. या सेंटरमध्ये 100 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात सत्ताधारी शिवसेनेचे दोन खासदार आहेत. शिवाय पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यासारख्या बड्या नेत्यांसह जिल्ह्यात दहा आमदार आहेत. तरीही कोल्हापूर जिल्हा आज कोरोनाशी एकाकी झुंज देत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ राज्यात पुन्हा मृत्यूचे थैमान! मध्यरात्री ऑक्सिजन संपला; 4 तासांत 13 रुग्णांचा मृत्यू

मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

फेसबुकवरील मैत्रीनं घातला 2 लाखांचा गंडा; नंतर केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य 

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विठू-रखुमाई आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास

विधवेवर पोलिसाकडूनच बलात्कार, गावकऱ्यांनी असा शिकवला धडा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More