बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रस्त्यावर ‘वर्दी उतरव’ म्हणत तरूणाची पोलिसांसमोर मुजोरी; अटकेनंतर ढसाढसा रडला

मुंबई | मीरारोडमध्ये गुरुवारी दुपारी गाडीला जॅमर लावल्याने तरूणाने पोलिसाला धमक्या देत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई कृष्णत दबडे हे नो पार्किंग मधील गाड्यांवर कारवाई करत होते. दुपारी अडीजच्या सुमारास मीरारोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य रस्त्यावर नो पार्किंग क्षेत्रात मोटार उभी केली होती. त्या ठिकाणी वाहन चालक दिसून न आल्याने त्यांनी जॅमर लावला.

एका दुकानातून अरुण रतन सिंग व त्याची पत्नी मीना हे दोघे बाहेर आले. गाडीला जॅमर लावल्याचं पाहून दोघांनी पोलिसांशी वाद घातला. वर्दी उतरव, पोलिसांना विकून गाडी दुरुस्त करू अशी मुजोरी करत रस्त्यावर दोघांनी गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं.

नया नगरचे पोलीस आल्यावर दोघांना ताब्यात घेण्यात आले. दबडे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अरुण व मीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात अटक करताच तो ढसाढसा रडू लागला.

थोडक्यात बातम्या- 

…म्हणून त्या 12 मंत्र्यांचा राजीनामा घेतला- नरेंद्र मोदी

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर ‘या’ मराठी अभिनेत्रीला ‘आनंद पोटात मायेना’; शेअर केली खास पोस्ट!

देशात कोरोनाची तिसरी लाट???; या राज्यात गेल्या 10 दिवसांमध्ये रूग्णसंख्या 12,000 ने वाढली!

“आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळालं, तुम्हीही एकत्र येऊन पुणे महापालिकेवर महाविकास आघाडी आणायला हवी”

नवनीत राणांना आवरला नाही कैऱ्या खाण्याचा मोह, पाहा नेमका काय किस्सा घडला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More