बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला; ‘ही’ असणार नवी नियमावली

मुंबई | राज्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरताना दिसत आहे. गेल्या दीड वर्षांपासून ठप्प असलेले व्यवहार आता रूळावर येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे पुन्हा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. पण आता लोकांचं मनोरंजन पुन्हा सुरू होणार आहे. चित्रपटगृह आणि नाट्यगृह उघडण्याचा मुहुर्त अखेर ठरला आहे.

नाट्यगृह, चित्रपटगृह उघडण्याचा आणि इतर महत्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ब्रेक द चेन अंतर्गत नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 22 ऑक्टोबरपासून राज्यभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे पुन्हा सुरू होणार आहेत. यासाठी राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने नवी नियमावली जाहिर केली आहे.

या नव्या नियमावलीनुसार, प्रतिबंधित क्षेत्रातील नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी नाही. तसेच मास्क आणि सॅनिटासझरचा वापर बंधनकारक आहे. कलाकार आणि कर्मचाऱ्यांनी नियमित तपासणी करणं बंधनकारक आहे. आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच, 50 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करण्याची परवानगी नसणार आहे.

सर्वांना आरोग्य सेतू अॅपचा वापर बंधनकारक आहे. कलाकार आणि प्रेक्षक सर्वांचे लसीकरण पूर्ण असणे बंधनकारक आहे. कलाकारांना कक्षात जाऊन भेटण्याची परवानगी नाही. केशभूषा आणि रंगभूषा करणाऱ्यांनी पीपीई कीट परिधान करणं बंधनकारक आहे. या नियमांचे पालन करणे सर्वांसाठीच बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

वानखेडे आणि कंबोज यांची भेट तर…; नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट

एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर मुंबई पोलिसांची पाळत?; व्हिडीओ पुराव्यासहीत वानखेडेंची तक्रार

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी WHOचा महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

आमदार रवी राणांच्या अडचणी वाढल्या; आमदारकी धोक्यात?

‘मुंबई क्रुझ प्रकरण पुर्णपणे खोटं, शाहरूख खान त्यांच्या निशाण्यावर’; शत्रुघ्न सिन्हा संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More