मुंबई | गुरुवारी मराठी रंगभूमीदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाटय़ निर्माते, कलाकारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाट्यगृहांचे भाडे कमी करणार असल्याचं सांगितलंय.
कोरोनाच्याच्या काळात निर्मात्यांचं देखील फार झालंय. त्यांच्याकडून विविध मागण्या येत आहेत. नाट्यगृहांच्या भाड्याच्या बाबतीत नाट्यनिर्मात्यांच्या मागणीवर राज्य सरकार नक्कीच विचार करील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलंय.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाची भीती अजून गेली नाहीये. त्यामुळे निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्य प्रयोग करा. तसंच कलाकार आणि प्रेक्षकांची काळजी घ्या. मास्क नाही- प्रवेश नाही यासह सर्व नियमांचं काटेकोर पालन करून नाट्य प्रयोग करा.
दरम्यान राज्यातील थिएटर, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेसह सुरु करण्यात आलीयेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना सुरु करण्याची मुभा देण्यात आलीये.
महत्त्वाच्या बातम्या
मुंबईकडून दिल्लीचा पराभव; सहाव्यांदा मिळावलं फायनलचं तिकीट
“जसं सामना शिवसेनेचं मुखपत्र, तसं ‘ते’ भाजपचं चॅनेल”
सवतीच्या पोरास सोन्याच्या चमच्याने दूध पाजायचे, शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
“सरकारने अर्णब गोस्वामींना अटक करून आणीबाणी सारखीच परिस्थिती निर्माण केली”
“रोहित शर्माच्या दुखापतीची सीबीआयद्वारे चौकशी करा”