Top News

पंकजा मुंडेंच्या ताब्यातील वैद्यनाथ साखर कारखान्यात चोरी; ‘इतक्या’ लाखांचं साहित्य लंपास

बीड | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात चोरी झाली आहे. कारखान्याच्या स्टोअर गोडाऊन आणि वर्कशॉपमधून तब्बल 37 लाख 84 हजारांचं साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार परळी ग्रामिण पोलिसांत 22 डिसेंबर रोजी देण्यात आली.

परळी पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला. या चोरी प्रकरणात अखेर परळी पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना मागच्या वर्षी बंद होता. त्यानंतर कोरोनोमुळे लॉकडाऊन झाले आणि याच दरम्यान वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये चोरी झाली आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातून जी चोरी झाली आहे त्यामध्ये बऱ्याच मोठ्या वस्तू होत्या. कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. चोरीच्या या घटनेत एकूण 37 लाख 84 हजार रुपयांचं साहित्य लंपास करण्यात आलं आहे

थोडक्यात बातम्या-

नाशिकमध्ये कोरोनामुळे 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू!

“कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, आता जास्त काळजी घ्यावी लागेल”

पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश राजकीय हेतूने- चंद्रकांत पाटील

शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा बातचितचा प्रस्ताव फेटाळला!

कोरोनाच्या आणखी एका प्रकारानं ब्रिटनमध्ये हाहाकार!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या