बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रूसलेल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी कायपण…; तरूणाने केला ‘हा’ कारनामा

बैतूल । प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट समजली जाते. आपल्या प्रेमासाठी लोक वाटेल ते करायला तयार असतात. प्रेयसी रुसून बसली तर तिला खूश करण्याची मजाच वेगळी असते. पण एका तरूणाला आपल्या प्रेयसीला खूश करणं चांगलंच महागात पडलं आहे. प्रेयसीला खूश करण्यासाठी तरूणाने एक अजब नाटक रचलं. या तरूणाने प्रेयसीच्याच घरात चोरी केल्याची घटना समोर आली आहे.

प्रियकराने आपल्या जीवावर खेळून हे सामान चोरट्यांकडून परत मिळवल्याचा बनाव रचला होता. 2 मार्चच्या रात्री बैतूलच्या महावीर वॉर्डातील एका घरात चोरी झाली होती. ज्या दिवशी ही चोरी झाली त्या दिवशी हे कुटुंब बाहेरगावी गेलं होतं. कुटुंब घरी परत आल्यावर त्यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या प्रेम यांनी त्यांना चोरीबद्दल माहिती दिली.

प्रेमने त्यांना सांगितलं की दोन चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला, काही वस्तू चोरली व पळ काढण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर लॅपटॉप आणि काही दागिने तिथेच टाकून चोरट्यांनी पळ काढला. प्रत्येकाने या कथेवर विश्वास ठेवला. यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. सुरुवातीला प्रेमच्या बोलण्यात अनेक तफावती आढळल्या होत्या, अगदी त्याची कहाणी बनावट वाटली. त्या आधारे पोलिसांना त्याच्यावर संशय आला.

दरम्यान, चौकशी केल्यानंतर प्रेमने खरी माहिती दिली. ज्या घरात त्याने चोरी केली आहे. त्या घरात त्याची प्रेमिका राहते असं त्यानी पोलीसांना सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या दोघांत भांडण झालं होतं. त्यामुळे प्रेयसीच्या नजरेत पुन्हा हिरो बनण्यासाठी त्याने हा कट रचला होता, अशी माहिती एसडीओपी नम्रता सोंधिया यांनी दिली आहे. पोलिसांनी आरोपी प्रेमला न्यायालयात हजर केलं असून आता त्याची रवानगी थेट तुरूंगात केली आहे.

थोडक्यात बातम्या-

कुख्यात गुंड गजा मारणेविरोधात पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

‘…तर पेट्रोल आणि डिझेल होऊ शकतं स्वस्त’; SBI च्या अर्थतज्ज्ञांनी सुचवला ‘हा’ पर्याय

अजित पवारांनी फडणवीसांना दिलेला ‘तो’ शब्द खरा करून दाखवला

वडिलांना ‘टकला’ म्हणणं मुलीला पडलं महागात; सावत्र बापाने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

पोलीस असल्याचं सांगून ठेवले शारीरिक संबंध, चौकशी केल्यावर समोर आला धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More