Top News महाराष्ट्र वाशिम

…तर यापुढे 30 टक्के पगार आई-वडिलांच्या खात्यावर जमा होणार!

वाशिम | मुलांच्या उज्ज्वल भविष्यसाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे त्यांच्या वेतनातील 30 टक्के रक्कम आई-वडिलांच्या बँक खात्यात जमा करावी लागणार असल्याचा निर्णय वाशिम जिल्हा परिषदेनं घेतला आहे.

वयोवृद्ध आई-वडिलांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मुलं विचारत नाहीत, त्यांचा सांभाळ करत नाहीत. त्यामुळे आई-वडिलांसमोर अर्थिक प्रश्न उभा राहतो. यासंदर्भात, वाशिम पंचायत समितीच्या सभापती रेश्मा गायकवाड यांनी आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातील 30 टक्के रक्कम आ-ईवडिलांना देण्याचा ठराव मांडला आहे.

हा ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर होऊन तशा आशयाचा निर्णयही जिल्हा परिषद प्रशासाने घेतला आहे. अशा स्वरुपाचा निर्णय घेणारी वाशिम ही एकमेव जिल्हा परिषद असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपला सांभाळ करत नाहीत अशी तक्रार आई-वडिलांनी जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात केली तर पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याला आई-वडिलांना सांभाळायची ताकीद देण्यात येईल. संबंधीत कर्मचाऱ्यानं नकार दिल्यास त्याच्या पगारातून 30 टक्के रक्कम थेट आई-वडिलांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

थोडक्यात बातम्या-

आर. अश्विनचा नादच खुळा; अनिल कुंबळेचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला!

पुणे-सोलापूर रोडवर 3 ठार; फॉर्च्युनर गाडीचाही झाला चक्काचूर

हम तो मरेंगे सनम, तुमको भी ले मरेंगे; ‘रोझ डे’ ठरला काळजाचा थरकाप उडवणारा

“फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली याचा अर्थ ती सेक्सच्या शोधात आहे असा नाही”

शेतकरी, जवान नाही तर मोदी सरकारसाठी तीन चार उद्योगपती देव- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या