बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘….तर राणा दाम्पत्यांवर कारवाई होणार’; गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा

मुंबई | खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) सध्या न्यायलयीन कोठडीत असून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे. कोठडीत असूनही राणा दाम्पत्य सरकारवर गंभीर आरोप करत असलेले पहायला मिळत आहे. अशातच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valase Patil) यांनी गंभीर इशारा दिला आहे.

नवनीत राणा यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाल्यास राणा यांच्यावर कारवाई करणार असल्याचा, गंभीर इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. पोलीस ठाण्यातील वागणुकीसंदर्भात आपण चौकशी केली असून तशी वस्तूस्थिती दिसत नाही, तरीही त्याचा तपशील लोकसभा अध्यक्षांना पाठवणार असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

न्यायालयीन कोठडीत पोलिसांकडून गैरवागणूक होत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. त्यामुळे भाजप मोठ्या प्रमाणवर आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्यांकडून मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन करणार येणार होतं. यावरुन शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

उष्णतेच्या लाटेविषयी हवामान विभागाचा गंभीर इशारा, म्हणाले…

मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांचा ‘तो’ व्हिडीओ केला ट्विट, पाहा व्हिडीओ

“जो नडला त्याला फोडला, मोदी असते तरीही कार अशीच फोडली असती”

Gold Rate ! सोन्याच्या दरात काय बदल झाले, वाचा एका क्लिकवर

“त्यांना खाजवण्याची सवय आहे आणि त्यामुळे त्यांची चमडी फाटणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More