Top News

“शिवसेनेकडे सत्ता आल्यास मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच!”

जळगाव | शिवसेनेकडे सत्ता आल्यास मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच!, असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते अमित शहा यांच्यात युतीच्या जागा वाटपाविषयी चर्चा झाली आहे. जागा वाटपाचा नवीन फाॅर्म्युला लवकरच समोर येईल, असंही संजय राऊत म्हणाले.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशिर्वाद यात्रा उद्यापासून(गुरूवार) सुरू होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.

ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार मानायचे आहेत… ज्यांनी नाही दिली त्यांची मनं जिंकायची आहेत, असा मानस ठेऊन ही यात्रा काढण्याचं शिवसेनेने ठरवलंय. आज शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून या यात्रेची माहिती देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपमध्ये आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको”

-मोदीजी तुमचे खूप खूप आभार…; कुलभूषण जाधव केसप्रकरणी सुषमा स्वराज यांना अत्यानंद

-कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा मोठा निर्णय

-…म्हणून अरविंद केजरीवाल यांनी केलं मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक!

-घराशेजारी कसले मोर्चे काढता???; नवाब मलिकांची शिवसेनेवर टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या