मुंबई | सत्तेचा वापर लोक चुकीच्या पद्धतीने होत असेल, तर लोक पुन्हा या सरकारला निवडून देणार नाहीत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जे इंदिरा गांधीच्या काळात झालं, जे 2004 साली झालं तेच पुन्हाही होऊ शकतं. त्यामुळे भाजपला पर्याय नाही, असं म्हणून चालणार नाही, पर्याय द्यायचा जनता ठरवेल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, संविधानामधून सेक्यूलर हा शब्द काढण्याची मागणी होतेय. त्यावर त्यांनी भाष्य केलं ते म्हणाले जो एकमतानं निर्णय झालाय तो बदलण्याचा अर्थ फक्त संसदेमध्येच होऊ शकतो त्यामुळे तुमच्या आमच्या बोलण्यानं काहीही फरक पडत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
-डिझेल आणि पेट्रोल भाव पुन्हा भडकले!
-आरएसएसच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना आमत्रंण?
सनातन संस्था बंदीच्या मागण्यांना भीक घालत नाही!
-बैठकीत महिला खासदारावर भडकले मोदी!
वैभव राऊतसह कुणाशीही आमचा संबंध नाही; सनातनचा खुलासा