बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिल्लीत तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झालीच नाही, पण… – शरद पवार

पुणे | काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्ली दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी अनेक दिग्गज नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर देशात भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी निर्माण करण्यात येईल का? अशी चर्चा होती. त्यावर शुक्रवारी खुद्द शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झालीच नाही. मात्र देशात पर्यायी आघाडी करायची झाल्यास काँग्रेसला सोबत घ्यावंच लागेल अशी आपली भूमिका आहे. तसेच याबाबत आपण सर्व संबधितांशी चर्चा करून ही बाब मांडली असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. दिल्लीतील बैठक ही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासंदर्भात होती, असं स्पष्ट करून विरोधकांचे संघटन करणं ही आमची जबाबदारी आहे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात राजकीय पक्षांना बाजूला ठेऊन आपले प्रश्‍न मांडले जातात, त्यामुळे आम्हालाही हा एक महत्त्वाचा प्रश्‍न वाटला. त्याच समर्थन कशा प्रकारे करता येईल, या आंदोलनाबाबत तसेच मागण्याबांबत केंद्राकडे सूचना करण्यासाठी श्‍वेतपत्रिका काढता येईल का? याबाबत या बैठकीत चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आघाडीचे सामूहिक नेतृत्व असावं, ही सगळयांची भूमिका असून सध्या पर्याय म्हणून उभे राहणाऱ्यांना शक्ती देणे आणि त्यांचे संघटन मजबूत ठेवणं हाच उद्देश असल्याचं  शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ; दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

‘या’ माजी केंद्रीय मंत्र्याचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

‘हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील पण…’; खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप ओबीसी आरक्षणावर आक्रमक पवित्रा; आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

‘कर नाही, तर डर कशाला’; प्रविण दरेकरांचा राऊतांना टोला

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More