बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील’; शरद पवारांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

मुंबई | गेल्या बऱ्याच महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. अशातच अजूनही कर्मचाऱ्यांचा संप काही मिटेना. त्यामुळे सरकारनही कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

आज एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणावर बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. एसटी पूर्वपदावर आणा, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

तुमच्या इतर प्रश्नांवरही सरकार सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार करेन, अशी ग्वाही पवारांनी दिली. सरकारवर विश्वास ठेवा आणि कामावर परत या, तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील. असं आवाहन शरद पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांना केलंय.

दरम्यान, गेल्या महिन्यांपासून प्रवाशांना झालेल्या त्रासाचं वर्णनही करता येणार नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं. त्यामुळे आता संप मागे होणार का याकडे लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

पोस्टाची ‘ही’ योजना कमी गुतंवणूकीत मिळवून देईल मोठा फायदा, वाचा काय आहे योजना

दिलासादायक! आजपासून ‘या’ भागात बूस्टर डोसला सुरुवात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाचा मोठा निर्णय, प्रवाशांना करावे लागणार ‘या’ नियमाचं पालन

Weather Update: पुढील 2-3 दिवस राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

धक्कादायक! गेल्या 24 तासात देशात आढळले तब्बल ‘एवढे’ कोरोना रुग्ण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More