बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेरी पाटी पाहताच अमृता फडणवीसांना आठवले एकनाथ शिंदे, म्हणाल्या…

मुंबई | झी मराठीवर(Zee Marathi) एका नव्या शोची चर्चा सर्वत्र आहे, तो शो म्हणजे बस बाई बस(Bus Bai Bus). हा शो जुलै महिन्याच्या शेवटी प्रेक्षकांच्या भेटील आला. या कार्यक्रमाला अल्पावधीतच कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. हा शो खास महिलांसाठी असल्याने अनेक महिला पाहुण्या या कार्यक्रमाला हजेरी लावत असतात. नुकतंच या कार्यक्रमाच्या एका भागात अ़मृता फडणवीस(Amruta Fadanvis)यांनी हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात अमृता यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. या शोच्या एका गेममध्ये त्यांना पुणेरी पाट्या दाखवण्यात आल्या आणि मुख्य म्हणजे त्या पाट्या कोणाच्या घरी शोभून दिसतील हेही सांगायचे होते. आमच्या येथे गुवाहाटीला जायला मोफत बस मिळेल, ही पुणेरी पाटी अमृता यांना दाखवण्यात आली त्यावर त्या म्हणाल्या’एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला जाऊन आलेत, त्यामुळे कोण कुठं जातं येतं याची कल्पना शिंदेना आहे, त्यामुळे ही पाटी शिंदेंच्या घराबाहेर शोभून दिसेन’

अमृता यांच्या उत्तरावर सुबोध भावे म्हणाले, आता पुण्यात तयार झालेली ही पाटी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर लावायला काही हरकत नाही. अमृता यांनी वैयक्तिक आयुष्यावरही अनेक गप्पा मारल्या, त्यामुळे हा भाग चांगलाच मनोरंजक ठरला.

दरम्यान, अमृता या एक सिंगर देखील आहे. अमृता यांना या शोमध्येही गाणे गाण्यास सांगण्यात आलं होतं. त्यांचं नुकतंच एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात.

थोडक्यात बातम्या-

‘बिग बॉस मराठी 4’ महेश मांजरेकर नाहीतर ‘हा’ अभिनेता होस्ट करणार?

अमित ठाकरेंची भाऊ आदित्य ठाकरेंवर टीका, म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं!

“पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारतीयांचा गौरव होतो”

संजय राऊतांनंतर आता काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता अडचणीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More