Top News राजकारण

“…तर बाळासाहेब ठाकरेंनीच प्रताप सरनाईकांचा कडेलोट केला असता”

मुंबई | भाजपाचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधलाय.

तानाजी मालुसरे यांची बदनामी करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. तसंच महाराष्ट्रासह संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नरेंद्र पवार यांनी केलीये.

सरनाईक यांनी स्वतःची तुलना तानाजी मालुसरे यांच्यासोबत करून त्यांचा अपमान केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनीच सरनाईकांचा कडेलोट केला असता, अशी टीकाही पवार यांनी केलीये.

दरम्यान ईडीच्या चौकशीनंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना, मी तानाजी मालुसरेंसारखा धारातीर्थी पडणारा सैनिक नाहीये, अशी प्रतिक्रिया दिली होती.

थोडक्यात बातम्या-

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हा भाजपचा एककलमी कार्यक्रम- अशोक चव्हाण

2020 मधील शेवटचं सूर्यग्रहण आज; ‘या’ ठिकाणी पाहता येणार सूर्यग्रहण

“पर्यटन मंत्र्यांनी खाजगी पर्यटनाच्या “दिशेला” जाताना जीन्स घालावी सरकारी कामकाजात नव्हे”

मला आता आरामाची गरज आहे; कमलनाथ यांचं मोठं विधान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित!

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या