…तर ‘शिवप्रतिष्ठान’च्या संभाजी भिडेंना होऊ शकते अटक

नाशिक | शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे पुन्हा एकदा न्यायालयीन सुनावणीला गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे नाशिक न्यायालयाने 12 ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचा समन्स भिडेंना दिला आहे.

मागील न्यायालयीन सुनावणीतही भिडे गैरहजर होते. आता मात्र पुढील सुनावणीत भिडे हजर नाही राहीले तर त्यांच्या अटकेचे आदेश न्यायालय देऊ शकते.

दरम्यान, आंबे खाल्ल्यानं मुलं होत असल्याचा कथित दावा संभाजी भिडे यांनी केला होता. त्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने चौकशी केली. त्यानंतर आरोग्य विभागाने नाशिक सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपचे मंत्री 15 दिवसात दोनदा भेटीला, मात्र अण्णा हजारे उपोषणावर ठाम

-अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांनंतर नाना पाटेकर अज्ञातवासात?

-…तर तुमच्या फेसबुक अकाऊंटवर सायबर हल्ला झालेला असू शकतो!

-धक्कादायक…! 5 कोटी फेसबुक खात्यांवर सायबर हल्ला

-भारताकडून पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक?