बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ …तर कोरोनाची लसही ठरु शकते निरुपयोगी’; WHOच्या माहितीनं जगाचं टेन्शन वाढलं!

नवी दिल्ली | कोरोनानं जगभरात चांगलाच हाहाकार माजवला आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सध्या देशभरात लसीकरण मोहिम राबवली जातेय. यातच कोरोना आटोक्यात येत असताना कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटनं चिंता वाढवली आहे. नवनवीन व्हेरिएंटमुळे लसीकरणावर काय परिणाम होईल याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटनं धुमाकूळ घातला असून याविषयी जागतिक आरोग्य संघटनेनं धक्कादायक माहिती दिली आहे. भविष्यात लसींनाही चकमा देणाऱ्या नवीन कोरोना व्हेरिएंटची संख्या वाढू शकते, असं जागतिक संघटनेचे डॉ. डेव्हिड नाबारो यांनी म्हटलं आहे. नवनवीन व्हेरिएंट आल्यावर लसही कमी प्रभावी ठरु शकते त्यामुळे आता पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

डाॅ. डेव्हिड नाबारो यांनी म्हटलं की, कोरोना लसीचा बूस्टर डोस द्यायची गरज आहे. त्यामुळे बूस्टर डोसची प्रतिक्षा केली पाहिजे. गरिब देशांनाही या लसीचा पुरवठा करणं आवश्यक आहे.

दरम्यान, अजूनही अनेक भागांमध्ये लसीकरण कमी आहे. कोरोनानंतर डेल्टा व्हेरिएंटनंही चांगलंच थैमान घातला होता. डेल्टा व्हेरिएंटवरही लसीकरणाचा प्रभाव कमी असल्याचंही संशोधनातून समोर आलं आहे. मात्र आता या कोरोना महामारीच्या लढ्यात लसीकरण हेच एकमेव शस्त्र असल्याचं पहायला मिळतंय.

थोडक्यात बातम्या –  

राज्यभर गाजलेल्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंची अखेर ‘या’ जिल्ह्यात बदली!

“गुजरात जर विकासाच्या मार्गावर होतं, मग रातोरात मुख्यमंत्री का बदलला?”

दरेकर, महिलांची माफी मागा नाहीतर गाल आणि थोबाड रंगवू- रुपाली चाकणकर

शेतकरी बांधवांनो खचून जाऊ नका, सरकार तुमच्या खंबीरपणे पाठीशी- धनंजय मुंडे

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More