बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एकाला बाहेर काढा मग, आपोआप देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील”

नागपूर | राज्यात राजकीय दसरा सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील शाब्दिक युद्ध आज दसऱ्याच्या दिवशी रंगलं आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमधून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमधून तर रामदास आठवले यांनी नागपूरमधून चांगलीच फटकेबाजी केली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपुर्वी मला अजूनही मुख्यमंत्री वाटत असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरून राज्यात बराच गदारोळ झाला होता. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत त्यातील एकाला बाहेर काढा मग आपोआप देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं आठवले म्हणाले आहेत.

आठवले यांनी बोलताना महाविकास आघाडीवर कवितेच्या माध्यमातून टीका केली आहे. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात आठवले बोलत होते. व्यसपिठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत वक्तव्य केल्यानं राज्याच्या राजकारणात आठवले यांचीच चर्चा आहे.

दरम्यान, आठवले यांच्यासह व्यासपिठावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या प्रसंगी आठवले यांनी कवितांच्या माध्यमातून कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली होती.

थोडक्यात बातम्या

ना रोहित, ना विराट बॉलिवूडचा भाईजान ‘या’ दोन खेळाडूंचा झालाय जबरा फॅन!

“मराठी-अमराठी गाडून हिंदूत्वाची भक्कम एकजूट बांधा”

“केवळ पित्याला दिलेलं वचन म्हणून मी मुख्यमंत्रीपदावर बसलोय”

“माझे पोलीस माफिया असतील तर यूपीचे पोलीस भारतभूषण आहेत का?”

“एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्रावर ॲसिड फेकताय, अरे कुठे फेडाल हे पाप”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More