बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर देवेंद्र फडणवीस खरे शिल्पकार असतील – चंद्रकांत पाटील

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार या विषयी बैठक घेताना दिसत आहे. गेल्या 7 दिवसांत मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाच्या विषयावर दोन वेळा सर्वपक्षीय बैठक घेतली. त्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्य मागासवर्गीय आयोगाला बोलावून इम्पेरिकल डेटा जमा करायचा. तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊ नये, या भूमिकेवर सर्वपक्षांचं मतैक्य घडवण्यात आमचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका निर्णायक आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण वाचवण्यात यश येईल आणि त्याचे शिल्पकार देवेंद्रजी असतील. हे निश्चित, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ओबीसी आरक्षणाचा विषय निकाली निघत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका होऊ नये, अशी भूमिका सर्वपक्षांनी घेतली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकावे, यासाठी इम्पेरिकल डाटा तयार करण्याबाबत सर्वपक्षांनी संमती दिली असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने झालेल्या पक्षीय बैठकीनंतर ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. तर दुसरीकडे काँग्रेसने देखील आधीपासूनच ओबीसी आरक्षणावर आपलं मत स्पष्ट केलं होतं. त्यामुळे ठाकरे सरकार ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक असल्याचं दिसून येतंय.

थोडक्यात बातम्या-

ओबीसी आरक्षणाचा विषय निकाली लागणार?; ‘या’ मुद्द्याला राज्यातील सर्व पक्षांचा पाठिंबा

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

स्मशानभूमीकडे जाताना सिद्धार्थ…सिद्धार्थ म्हणत शेहनाजचा आक्रोश, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More