मुंबईत चाफा फुलवला तरच खासदार निधी देईल- रेखा

मुंबई | मुंबईतील बँडस्टँडमध्ये चाफ्याची झाडं लावीत असाल, तरच खासदार निधी देईल, अशी भूमिका राज्य़सभेच्या माजी खासदार आणि अभिनेत्री रेखा यांनी घेतली असल्याचं समजतंय.

रेखा यांच्या खासदार निधीतून 200 चाफ्याची झाडं लावली जाणार आहेत. त्यासाठी तब्बल 2 कोटी 60 हजार रूपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान, राखी यांच्या या भूमिकेला स्थानिक आणि रेसीडेन्शियल ट्रस्टने विरोध केला. कारण समुद्र किनारी ही झाडं तग धरू शकणार का नाही? लावल्यानंतर या झाडांच्या व्यवस्थेचा खर्च कोणी करायचा?. त्यामुळे रेखा यांनी टर्म संपत असताना खासदार निधी वापरायला घेतला आहे. मात्र तो वापरला जाणार की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-टँकरमुक्त महाराष्ट्राची घोषणा कुठं गेली?, काँग्रेसचा फडणवीस सरकारला सवाल

-फडणवीस सरकारची जलयुक्त शिवार योजना फेल; 14 हजार गावांची भूजल पातळी घटली!  

-एका कुटुंबासाठी नेताजींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न झाला; मोदींचा गांधी परिवारावर हल्लाबोल  

-३१ ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा

-मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं सेल्फीसाठी नसतं धाडस; पोलिस अधिकाऱ्यानं कपाळावर मारला हात  

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या