बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…तर मी राजकीय संन्यास घेईल- देवेंद्र फडणवीस

नागपूर | सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. ओबीसींना त्यांच्या हक्काचे राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपकडून आज चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

आमच्या हाती सूत्र द्या, मी ओबीसींचं आरक्षण परत आणून दाखवतो. जर असं करून दाखवलं नाही तर राजकीय संन्यास घेईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षणासाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

ओबीसीचं आरक्षण घालवलं हे राजकीय षडयंत्र आहे. राज्याचे नेते काही झालं तर नरेंद्र मोदींकडे बोट दाखवतात. उद्या यांच्या बायकोनी मारलं तरी तेव्हा देखील हे मोदी यांच्याकडेच बोट दाखवतील, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधांना चांगलंच फटकारलं आहे.

राज्य सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचे महत्व ताटातल्या चटणी, कोशिंबीर प्रमाणे आहे. महाराष्ट्रात ज्या प्रकारे ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले त्यामुळे एक तर आरक्षण द्यावं लागेल नाहीतर खुर्ची खाली करावी लागणार असल्याचा सूचक इशारा फडणवीसांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“आम्हाला अटक केली तरी आमचा हा लढा सुरूच राहील”

चुकून तुम्ही सत्तेत आलात, भविष्यात जनता तुम्हाला दारातही उभं करणार नाही- पंकजा मुंडे

“भाजपचं ओबीसी आरक्षणासाठीचं आंदोलन म्हणजे, बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना”

ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या प्रविण दरेकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात!

‘बघून घेऊ’, अनिल देशमुखांवरच्या कारवाईवर संजय राऊतांचं रोखठोक उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More