…म्हणून मी राजीनामा दिला; तारिक अन्वर यांचा खुलासा!

नवी दिल्ली | शरद पवारांनी राफेल प्रकरणी जे वक्तव्य केलं ते मला पटलं नाही, तसंच पवारांनी जे वक्तव्य केलं होतं, त्यावर पवारांनी स्वत: स्पष्टीकरण द्यायला हवं होतं, मात्र त्यांनी ते दिलं नाही म्हणून मी आपल्या पदाचा राजीनामा दिला, असा खुलासा तारिक अन्वर यांनी केला आहे.

शरद पवारांनी राफेल प्रकरणी मोदींची पाठराखण केली आहे, असा आरोपही पवारांवर ठेवत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र पवारांनी मोदींची पाठराखण केलेली नाही, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, बिहारमध्ये काँग्रेसला कोणतंच मोठं नेतृत्व नसल्यामुळे शरद पवारांच्या वक्तव्याचा आधार घेत अन्वर यांनी राजीनामा दिला असून ते काँग्रेसमध्ये वापसी करणार असल्याचं बोललं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-राहुल गांधींचा एक डाव आणि शरद पवार धोबीपछाड?

-… अन् जितेंद्र आव्हाडांनी उडवलं राफेलचं विमान

-सरकारची ही कृती म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखा प्रकार

-शरद पवारांवर नाराज होऊन राजीनामा दिल्याची बातमी चुकीची-सुशिलकुमार शिंदे

-अॅपलचे 3 नवीन आयफोन बाजारात, किमती पाहून थक्क व्हाल!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या